संस्थे विषयी

श्री गणेश नागरी सहकारी पतसंस्था मर्या.मालवण

आमचा परिचय

उत्कृष्ठ ग्राहक सेवा आणि ग्राहक हित ’ यांना सर्वोच्च प्राधान्य देऊन सर्वाधिक पसंतीची आघाडीची नागरी सहकारी पतसंस्था असा लौकिक मिळवणे, हे आमचे ध्येय आहे.

सभासदांच्या आर्थिक गरजा विचारात घेऊन विविध प्रकारच्या योजना राबवित सभासदांना कर्जवाटप करते. संस्थेने कामधेनु महिला नागरी सहकारी पतसंस्था सभासदांचे हित लक्षात घेऊन माहे डिसेंबर २०१२ मध्ये आपल्या संस्थेत सामावुन घेऊन संस्थेचा पाया अधिकच बळकट केलेला आहे.
आज संस्थेचे सर्व कामकाज संगणीकृत आहे. संस्थेत इंटरनेट सुविधा उपलब्ध असुन संस्थेकडे सध्या ३ कर्मचारी वर्ग कार्यालयीन कामाकाज पाहात आहेत.

संस्थेतील व्यवहारासोबत दैनंदीन जीवनातील महत्वाच्या अशा मोबाईल/डिश टीव्ही रीचार्ज,पोस्ट पेड मोबाईल बील भरणा, ऑनलाईन वीज बील, टेलिफोन बील,रेल्वे/विमान/बस बुकींग इत्यादी सेवा सुरु करुन सर्व सुविधा एकाच ठीकाणी उपलब्ध करुन दिले आहेत.
त्याच प्रमाणे मालवणी बझार ग्राहक सहकारी संस्था,सुशिक्षीत बेरोजगार जी.डी.सी. आणि ए संस्था,कामधेनु महिला नागरी सहकारी पतसंस्था यांनी आमचेसोबत येऊन सामाजिक कार्य करण्याचे हेतुने मालवणी बझार विविध सेवा ‍‌‌ट्रस्ट मालवण हा नोंदणीकृत ट्रस्ट स्थापन केला आहे. या ट्रस्ट च्या माध्यमाने विविध उपक्रम राबविले जातात.

१· संस्था – ‘आदर्श पतसंस्था पुस्कार’- ए.एस. प्रतिष्ठान, कोल्हापुर.

२· चेअरमन – श्री.एम.पी. पाटील ‘ आदर्श चेअरमन पुरस्कार– ए. एस. प्रतिष्ठान,, कोल्हापुर.

३· व्यवस्थापक – कु. सुप्रिया श्री. मसुरकर ‘आदर्श सचिव पुरस्कार’ – ए. एस. प्रतिष्ठान, कोल्हापुर.

४· संचालक  – श्री. आर. डी. बनसोडे ‘ आदर्श हिंदी प्रचारक पुरस्कार’ – सिंधुदुर्ग जिल्हा हिंदी मंडळ

 

आपल्या सुस्मीत सेवेच्या १६ व्या वर्षात कृतज्ञता व्यक्त करण्याचा मार्ग म्हणून पतसंस्थेने आपल्या ग्राहक व हितचिंतकांकर्ता आरोग्य तपासणी शिबीरे आयोजित केली.