योजना

 

संस्थेने सभासदांसाठी विविध प्रकारच्या ठेव योजना सुरु करुन सभासदांना बचतीची सवय लावलेली आहे. ठेवीची नियमित परतफेड करुन सभासदांचा विश्वास संपादन केलेला आहे. संस्थेकडे आज अल्प मुदत ठेव, मुदत ठेव १ वर्ष,मुदत ठेव २ वर्षे, मुदत ठेव ३ वर्षे, मुदत ठेव ५ वर्षे  तसेच आवर्त ठेव योजना,श्री गणेश पिग्मी ठेव योजना, बचत ठेव, मासिक व्याज प्राप्ती ठेव योजना,विशेष लखपती ठेव योजना राबवल्या आहेत. आजा अखेर संस्थेकडे एकुण १०५९ खातेधारांनी विविध ठेव योजनेत रक्कम गुंतवणुक केलेली आहे.

 

संस्थेने सभासदांच्या आर्थिक गरजा विचारात घेवून सभासदांना विविध प्रकारचा कर्ज पुरवठा करते. यामध्ये जामिनकी कर्ज, सोनेतारण कर्ज, वाहनतारण कर्ज, ठेवतारण कर्ज, वस्तू तारण कर्ज अशा विविध प्रकारच्या योजना राबवित संस्थेकडून सभासदांना कर्ज वाटप सुरू आहे.बेरोजगार तरुणांनी नोकरीच्या शोधत न राहता आपला स्वतःचा व्यवसाय करावा यासाठी संस्थेने मोठ्या प्रमाणात तरुणांना कर्जाचे वितरण केलेले आहे.